Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यांची पुण्यातील सभा रद्द! अचानक घेतलेल्या निर्णयामुळे चर्चांना उधाण

Webdunia
बुधवार, 18 मे 2022 (22:36 IST)
राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसाचं कारण देत ही सभा रद्द करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे हे 21 मे रोजी पुण्यातील नदीपात्राच्या परिसरात सभा घेणार होते. त्यासाठी तयारी सुद्धा सुरु झाली होती, नदीपात्रातील जागेची पाहणी करुन त्याठिकाणी स्वच्छता करण्याचं काम देखील सुरु करण्यात आलं होतं. राज ठाकरे स्वत: दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असतानाच या तारखेची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता अचानक ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अयोध्या दौऱ्यापूर्वी होणारी ही सभा अत्यंत महत्वाची मानली जात होती. त्यामुळे राज ठाकरेंची सभा नेमकी कधी होणार हा सवाल निर्माण झाला आहे. 
 
पुणे दौैऱ्यावर असलेले राज ठाकरे हे काहीवेळापूर्वीच मुंबईसाठी रवाना झाले आहेत. यादरम्यानच ही माहिती समोर आली आहे. सभा रद्द होण्याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी पावसामुळे ही सभा रद्द करण्यात आल्याचं सध्या सांगण्यात येतंय. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका, रविवारी झालेल्या पदाधिकारी मेळाव्याचा आढावा राज ठाकरे यांनी या दौऱ्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील सभेबाबत देखील चर्चा या दौऱ्यात झाली आहे. विषेश म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे हे नाराज असून, त्यांची मोठी चर्चा सुरु आहे. राज ठाकरे स्वतः पुढाकार घेऊन पुण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणतील आणि वसंत मोरेंच्या नाराजी नाट्याचा निकाल लावतील अशी देखील शक्यता होती. मात्र या दौऱ्यात वसंत मोरेंची आणि त्यांची भेट झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाही.
 
अयोध्या दौऱ्यापूर्वी होणारी राज ठाकरे यांची ही सभा महत्वाची मानली जात होती. याच सभेत ते त्यांना आव्हान देणाऱ्या भाजप खासदार बृजभुषण सिंह यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर देतील अशी शक्यता होती. त्यामुळे आता ही सभा रद्द झाल्यानंतर राज ठाकरे बृजभुषण सिंह यांना उत्तर नेमकं कधी देणार? त्यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी ते पत्रकार परिषदेतून भूमिका मांडणार का? अयोध्या दौरा त्याच तारखेला होणार का असे अनेक प्रश्न पडले आहेत. कारण तिकडे बृज भुषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला मोठं आव्हान दिलं आहे. राज ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्यावरुन उत्तर भारतीयांना त्रास दिला असून, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी बृज भुषण शरण सिंह यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या विरोधात त्यांनी आता मोठी आघाडी उघडली असून, 5 जुन रोजी अयोध्येत 5 लाख लोक आलेले असतील. या 5 लाखांचे 6 लाख होतील, मात्र एक हजार सुद्धा कमी होणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी माफी मागितली तरी, ते अयोध्येत येऊ शकणार नाही असंही बृज भुषण सिंह म्हणाले आहेत.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments