Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PMPML ची नवी बससेवा सुरु, आता AC बसमधून करा मनमुराद ‘पुणे दर्शन’

Webdunia
गुरूवार, 4 मे 2023 (21:05 IST)
पुणे शहराच्या आसपासच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी 1 मे 2023 पासून पीएमपीएमएल खास वातानुकूलित पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे मुलांना शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत, लहान मुलांना कुठे घेऊन जायचं, फिरायला जायचे असेल तर कुठे आणि कसं जायचं?, हे सगळे प्रश्न पुणे महानगर परिवहन महामंडळाने सोडवले आहेत.
 
पीएमपीएमएलने नागरिकांसाठी एक पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. या बस शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यरत असणार आहेत.
 
या सेवेसाठी प्रत्येक मार्गावर वेगवेगळे दर असतील. यापूर्वी, तिकीटाच्या किमतींमुळे या सेवेला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. सोशल मीडियावर प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने, पीएमपीएमएलने तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी ही घोषणा केली.
 
दरम्यान पीएमपीएमएलच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. वातानुकूलित ई-बस प्रवाशांना पुणे आणि आजूबाजूच्या धार्मिक आणि पर्यटनस्थळी घेऊन जातील. एकूण सात पर्यटक बस सेवा आहेत आणि सुधारित तिकीट दर सर्व मार्गांवर लागू करण्यात आले आहेत. या बससेवेसाठी तिकीट दर- 700 रुपये प्रति प्रवासी असणार आहे.
 
या सेवेसाठी खालील ठिकाणी बुकिंग करता येईल
परिवहन महामंडळाचे
1) डेक्कन जिमखाना
2) पुणे स्टेशन
3) स्वारगेट
4) कात्रज
5) हडपसर गाडीतळ
6) भोसरी बसस्थानक
7) निगडी
8) मनपा भवन
 
सदरील बससेवेचे ज्या दिवशी बुकींग केले असेल त्या दिवशी सदर प्रवासास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत आणि सायंकाळी पोहचल्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या घरापर्यंत सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा राहील. तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाईड सेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
 
PMPML बसचे मार्ग कोणते असतील?
मार्ग 1
सुटण्याचे ठिकाण : हडपसर गाडीतळ
हडपसर, मोरगांव, जेजूरी, सासवड, हडपसर
 
तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी
 
मार्ग 2
सुटण्याचे ठिकाण : हडपसर गाडीतळ
हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर
 
तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी
 
मार्ग 3
सुटण्याचे ठिकाण : डेक्कन जिमखाना
डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन
 
तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी
 
मार्ग 4
सुटण्याचे ठिकाण : पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक
पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन
 
तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी
 
मार्ग 5
सुटण्याचे ठिकाण : पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक
 
पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन
 
तिकीट दर- 700 रुपये प्रति प्रवासी
 
मार्ग 6
सुटण्याचे ठिकाणी : पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक
पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली). वाडेबोल्हाई छ. संभाजी महाराज समाधीमंदिर (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन
 
तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी
 
मार्ग 7 –
सुटण्याचे ठिकाण : निगडी भक्ती शक्ती बसस्थानक
भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसार्वी मंदिर (चिंचवडू), प्रतिशिर्डी (शिरगांव), देहूगांव, गांथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Mahrashtra Exit Polls : महाराष्ट्रात महायुती की एमव्हीए? एक्झिट पोलनंतर गोंधळ वाढला

Balasaheb Shinde Died: बीडचे उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Exit Poll Result 2024: झारखंडमध्ये कोणाचे सरकार, एक्झिट पोल काय सांगतात?

Exit Poll 2024 महाराष्ट्रात सरकार कोण बनवणार, एक्झिट पोल काय सांगतात?

LIVE: महाराष्ट्रात मतदान पूर्ण झाले

पुढील लेख
Show comments