Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात पाण्यासाठी भाजपचे आंदोलन, महापालिकेकडून गुन्हा दाखल

पुण्यात पाण्यासाठी भाजपचे आंदोलन, महापालिकेकडून गुन्हा दाखल
, मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (08:26 IST)
पुण्याच्या दक्षिण भागाला सुरळीत पाणी मिळावे याकरिता स्वारगेट पाणीपुरवठा विभागात भाजपने आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, कार्यालयाची तोडफोड करण्यात आली तसेच अधिकाऱ्यांना दमबाजी करीत शिवीगाळही करण्यात आल्याचा प्रकार घडला.
 
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह त्यांची आई नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, वृषाली कामठे, मनीषा कदम आणि नगरसेवक वीरसेन जगताप यांना अटक करण्यात आली.
 
शहराच्या दक्षिण भागात असलेल्या कात्रज, कोंढवा, वानवडी आदी परिसराला वडगाव जलशुद्धीकरण केंद्रामधून पाणी पुरवठा केला जातो. परंतु, मागील काही महिन्यांपासून हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासोबतच या भागातील नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही हाती काहीच लागत नसल्याने भाजपाने माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट पाणीपुरवठा विभागात आंदोलन केले.
 
हे आंदोलन सुरू असताना कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांच्याशी आंदोलकांची खडाजंगी झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांना संभाजी आणि शिवीगाळ करण्यात आली तसेच कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना स्वारगेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचा वाद शिगेला, एकाची निर्घृणपणे हत्या