Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे : इंद्रायणी नदीत उडी मारणाऱ्या महिला पोलिसाचा मृतदेह सापडला

Webdunia
बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (18:49 IST)
पुण्यातील आळंदी मध्ये इंद्रायणीच्या नदीपात्रात उडी घेत आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिसाचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी सापडला आहे. या महिला पोलिसाने रविवारी संध्याकाळी 5:15 वाजेच्या सुमारास पाण्यात उडी घेतली. त्यांनतर वेगवेगळ्या शोध पथकाने तिचा शोध घेतला अखेर महिला पोलिसाचा मृतदेह तीन दिवसांनंतर गोलेगाव येथे आढळला.अनुष्का केदार असे या मयत महिला पोलीसचे नाव आहे.अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या आणि सध्या पुणे ग्रामीण मुख्यालयात नेमणुकीला होत्या.

त्यांनी रविवारी इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून पाण्यात उडी घेत आपले आयुष्य संपविले. घटनेची माहिती मिळाल्यावर आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमनदलाला देखील बोलावले. अंधार झाल्यामुळे महिला पोलिसांना शोधण्याचे काम थांबविले. सोमवारी आणि मंगळवारी शोध मोहीम सुरु करण्यात आली. 

महिला पोलिसाचा शोध आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ पथकाने केला. अखेर आज बुधवारी महिला पोलिसाचा मृतदेह गोलेगाव येथे आढळला. 
Edited by - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

तो नॅपी धीरेंद्र शास्त्री आहे, मी त्याच्या वयाइतकीच वर्षे तपश्चर्या केली आहे, ममता कुलकर्णी संतापल्या

लग्नात नवरदेवाने 'चोली के पीछे क्या है' गाण्यावर नाच केला, वधूच्या वडिलांनी तोडले लग्न

LIVE: आदित्य ठाकरे शिंदेंच्या शिवसेनाला देशद्रोही टोळी म्हणाले

अर्थसंकल्पावरून काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी मोदी सरकारवर टीका केली

गोधरा रेल्वे घटनेतील आरोपीला चोरीच्या आरोपाखाली पुण्यात अटक

पुढील लेख
Show comments