Festival Posters

मुलगा मोबाईल आई गळफास आणि खून वाचा पुणे येथील घटना

Webdunia
सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (20:54 IST)
मुलगा अभ्यासाकडे लक्ष न देता फक्त मोबाईल पाहत असल्याने आई रागवल्यामुळे मुलाने आईला भिंतीवर ढकलून देऊन गळा दाबून तिचा खून केला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे जय मल्हार रोड परिसरात बुधवारी (ता. १५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. तस्लिम जमीर शेख (वय ३७) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, याप्रकरणी झिशान जमीर शेख (वय १८) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
 
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथे जय मल्हार रस्ता परिसरात तस्लिम जमीर शेख या पती व एका मुलासोबत राहत होत्या. त्यांनी बुधवारी (ता. १५) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला होता. तेव्हा तस्लिम यांचा गळा दाबून व डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 तारखेला उरळी कांचन भागात एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी प्राथमिक शवविचछेदन अहवालासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित महिलेचा गळा दाबून आणि डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
 
पोलिसांनी आपला तपास त्या दिशेने वळवत कुटुंबियांची चौकशी केली. त्यात मुलगा जीशान (वय. १८) याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. जीशान हा बारावीला आहे, हा अभ्यास करत असताना मोबाईल त्याच्या आईने त्याला मोबाईल पाहतो म्हणून रागवून मारलं होतं. याचा राग अनावर झाल्याने जिशानने त्याच्या आईला भिंतीवर ढकलले आणि तिचा गळा दाबून खून केला. घाबरलेल्या जिशनने त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून आईच्या हाताची नस कापली मात्र रक्त न आल्याने त्याने मृतदेहाला पंख्याला लटकवले आणि तिने आत्महत्या केली असा बनाव केला.
 
दरम्यान, आरोपी मुलगा जिशान जमीर शेख याला लाेणीकाळभाेर पाेलिसांनी अटक केले आहे. त्याच्या विराेधात पाेलिस उपनिरीक्षक अमाेल घाेडके यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पाेलिसांनी आराेपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

प्रशांत जगताप हे काँग्रेसच्या वैचारिक निष्ठेचे प्रतीक असल्याचे म्हणत पुण्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला

अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम शिंदे शिवसेनेत सामील

LIVE: Ladki Bahin Yojana मकर संक्रांतीला महिलांना ₹३,००० मिळणार!

राज्यात ‘या’ दिवशी सुट्टी जाहीर!

हिजाब परिधान करणारी महिला भारताची पंतप्रधान होणार, ओवेसींच्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ

पुढील लेख
Show comments