Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेफेड्रोन विक्रीसाठी मुंबईतून आलेला शम्स झवेरी पोलिसांच्या जाळ्यात

Webdunia
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (15:43 IST)
सिंहगड रस्ता पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीसाठी मुंबईतून आलेल्या शम्स महमद अली जवेरी (वय 60) याला अटक केली आहे.नवले ब्रिज कडे जाणाऱ्या सर्विस रस्त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 20 ग्रॅम 460 मिलीग्रॅम मेफेड्रोन हे अमली पदार्थ सापडले आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते.यावेळी त्यांना नवले ब्रिजकडे जाणाऱ्या सर्विस रस्त्यावर असलेल्या चैतन्य बियर शॉपी समोर 60 वर्षीय व्यक्ती संशयास्पदरित्या हालचाल करताना दिसला.त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ हे अमली पदार्थ सापडले.
 
त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत आरोपी मीरा रोड,ईस्ट मुंबई येथून पुण्यामध्ये अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आला होता.सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. 15 सप्टेंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

LIVE:रोहित पवारांचा आरोप- भाजप सदस्यांचा EVM स्ट्राँग रूममध्ये शिरण्याचा प्रयत्न

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीक हत्याकांड प्रकरणात अकोल्यातून 26 वी अटक

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

Israel-Hamas War: 'गाझामधील मृतांची संख्या 44 हजारांच्या पुढे

पुढील लेख
Show comments