Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात पाण्याची टाकी कोसळून आतापर्यंत 5 मजुरांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (10:10 IST)
महाराष्ट्रातील पुण्यात गुरुवारी सकाळी पाण्याची टाकी कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला असून, आज त्यांची संख्या 5 झाली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कामगार छावणीत गुरुवारी सकाळी पाण्याची टाकी कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
तसेच पुण्यात टाकी बांधताना निकृष्ट साहित्याचा वापर करणे महागात पडले असून त्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी झाले. या घटनेबाबत पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी भागात सकाळी काही मजूर पाण्याच्या टाकीखाली आंघोळ करत असताना ही घटना घडली. पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणाले की, "पाण्याच्या दाबामुळे टाकी फुटली, त्यामुळे ती कोसळली आणि टाकीच्या खाली उपस्थित असलेले कामगार ढिगाऱ्याखाली अडकले."
 
तसेच यामध्ये “तीन जण जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
 
तसेच कुमार लोमटे नावाच्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते. ते बनवताना आरोपींनी निकृष्ट काम केले होते.” असे सांगण्यात येत आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments