Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्नीला राहयचे होते वेगळे, सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या

Webdunia
गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (12:32 IST)
पत्नी, सासु आणि सासर्‍यांच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना धनकवडीमध्ये घडली आहे. 30 वर्षीय शरद नरेंद्र भोसले असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. 
 
आत्महत्या करण्यापूर्वी शरद भोसले यांनी सुसाइड नोट सोडले आहे. त्या चिठ्ठीत संशयी पत्नी व तिचे आईवडिल, भाऊ यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटलं आहे. 
 
या घटनेनंतर सहकारनगर पोलिसांनी पत्नी प्रियंका शरद भोसले (वय २८), मेव्हणा मनिष ऊर्फ गणेश शंकर शिंदे (वय २७), शंकर शिंदे (वय ५६), रोहिणी शंकर शिंदे (वय ५०) यांच्या नावावर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. याप्रकरणी नरेंद्र दत्तात्रय भोसले यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 
 
पत्नीला वेगळे राहायचं होतं
शरद आणि प्रियंका यांचे २०१८ मध्ये लग्न झाले असून पत्नीला आधीपासूनच वेगळे राहायचं होतं. यावरुन ती पतीशी भांडणे करुन माहेरी निघुन जात असे. याशिवाय पत्नी शरद याच्या चारित्र्याचा संशय घेऊन वाद घालत होती. माहेरी तिचे आईवडिल तिला पाठिंबा देत असे. तर काही दिवसांपूर्वी शरदचा मेव्हण्याने त्यांच्यातील भांडणे मिटविण्यासाठी प्रयत्न केले असताना वाद अजूनच चिघळला आणि मारहाण देखील झाली.
 
पत्नी आणि सासरच्यांच्या तक्रारी आणि त्रासाला कंटाळून शरदनं २९ ऑगस्ट रोजी बेडरुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शरदने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून त्यात पत्नीचे सातत्याने माहेरी निघुन जाणे, सासु- सासरे तिला भडकवण्याचे व त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

Mahakumbh Fire : महाकुंभमेळा परिसरात लागलेली आग आटोक्यात आली, कोणतीही जीवितहानी झाली नाही

महाकुंभ मेळा परिसरात शास्त्री पुलाखालील पंडालला आग,अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल

सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद शहजाद कोण आहे, त्याचे बांगलादेशशी काय कनेक्शन आहे?

LIVE: बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया

बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया, मी अर्जुन आहे म्हणाले

पुढील लेख
Show comments