suvichar

SSC HSC Exam 2024 Dates दहावी-बारावी परीक्षेची तारीख

Webdunia
सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (15:50 IST)
SSC HSC Exam 2024 Dates बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची १ मार्चपासून होणार सुरू
 
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे.
 
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत दहावी-बारावीची लेखी परीक्षा घेण्यात येत असून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेचा कालावधी राज्य मंडळाने जाहीर केला आहे. 
 
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 दरम्यान तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2024 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.
 
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. 
 
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करणे या हेतूने लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.
 
मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असल्याचे सांगितले आहे. इतर संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्‌ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्र्यांच्या बाईकची पीयूसी संपली आहे! वर्षा गायकवाड यांच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापले

LIVE: आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

अकोला, अमरावती आणि जळगावमध्ये पारा ४५°C च्या वर गेला; आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा; लातूरमध्ये निवृत्त प्राध्यापकाच्या घरी सीबीआयचा छापा, मोबाईल फोन आणि कागदपत्रे जप्त

अशोक खरात प्रकरणात एसआयटीची मोठी कारवाई, १३,००० हून अधिक आक्षेपार्ह लिंक्स हटवल्या

पुढील लेख
Show comments