Dharma Sangrah

तज्ज्ञांच्या पथकांकडून पाहणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होईल : अजित पवार

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (07:52 IST)
पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूट इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून आगीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून तज्ज्ञांच्या पथकांकडून पाहणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
 
पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची  पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनास्थळी उपस्थित पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार चेतन तुपे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी माहिती घेतली. 
 
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनाप्रतिबंधक लसीमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळवलेल्या सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेली आग व आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामागारांना श्रद्धांजली वाहून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या.
 
आग लागलेल्या इमारतीत अंधार असल्याने रात्री तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे सकाळी संबंधित तज्ञांच्या पथकांकडून दुर्घटनेतील प्रत्येक मजल्याची तपासणी करण्यात येईल. त्यातून आगीचे कारण स्पष्ट होण्यास मदत होईल, मृतांच्या संख्येबाबत निश्चितपणे सांगता येईल. सदर इन्स्ट्यिट्यूट ‘एसईझेड’ क्षेत्रात असून इन्स्ट्यिट्यूट इमारतीचे फायर ऑडीट, एनर्जी ऑडीट तसेच इतर आवश्यक तपासण्यांची पुर्तता करण्यात आली होती का, याचीही चौकशी करण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडियामध्ये करार करत स्वतः युद्धबंदीची घोषणा केली

सोने-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, 2100 रुपयांनी वधारले

प्रसिद्ध खेळाडूने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला

तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

पुढील लेख
Show comments