Marathi Biodata Maker

पुण्यात झिका व्हायरसची रुग्णसंख्या 11 झाली

Webdunia
सोमवार, 8 जुलै 2024 (21:42 IST)
सध्या पुण्यात झिका व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आता याव्हायरसची लागण लागलेल्या रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली आहे. या विषाणूंची लागण लागलेल्या रुग्णामध्ये 5 गर्भवती महिलांचा समावेश आहे. 
एरंडवणे भागातून झिकाची लागण लागल्याचे चार रुग्ण आढळले होते. त्या रुग्णांपैकी दोन गर्भवती महिलांना लागण लागले. त्यानंतर मुढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात दोन रुग्णांना झिका व्हायरसचा संसर्ग लागल्याचे आढळले.

त्यापैकी एक गर्भवती महिला आहे. तसेच पाषाण, डहाणूकर कॉलोनी, आंबेगाव बुद्रुक मध्ये देखील एका पाठोपाठ एक झिका व्हायरसचे नवीन रुग्ण आढळले. पाषाण,आंबेगाव बुद्रुक मध्ये दोन गर्भवती महिलांना या व्हायरसची लागण लागली आहे. आता पर्यंत या व्हायरस ची गर्भवती महिलांना लागण लागल्याची संख्या 5 झाली आहे. 
 
कर्वेनगर आणि खराडी भागात देखील दोन जणांना या विषाणूंची लागण लागली आहे. कर्वे नगर येथे एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेला या विषाणूची लागण लागली असल्याचे महापालिकेच्या आरोग्यविभागातर्फे सांगितले आहे. या रुग्णांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत असून त्यांच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल झिका व्हायरसचे संसर्ग लागल्याचे सांगण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना डासांपासून संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईची मतदार यादी वादग्रस्त म्हणत विरोधकांनी केला हल्लबोल

अमरावतीच्या तिवासा तहसीलमधील शिवणगाव-बेनोडा भागात भूकंपाचे धक्के जाणवले

पटणामध्ये तिहेरी हत्याकांड; व्यापाऱ्याची हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या गुन्हेगारांना लोकांनी बेदम मारहाण करून केले ठार

हवामान पुन्हा बदलेल? चक्रीवादळाचा धोका; या राज्यांमध्ये आयएमडीचा इशारा

पाकिस्तानमध्ये मुलांनी रॉकेटला खेळणे समजून उचलले, स्फोट होताच तीन जण ठार

पुढील लेख