Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मास्क दंडात्मक कारवाईतील 50 टक्के महसुल पोलिसांना मिळणार

Webdunia
सोमवार, 29 मार्च 2021 (16:20 IST)
कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्यास पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाबरोबरच पिंपरी – चिंचवड पोलीसांकडूनही मास्क न वापरणा-या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीसांकडून मास्क सक्तीबाबत दंडात्मक कारवाई करून जमा झालेल्या 100 टक्के महसुलापैकी 50 टक्के महसुल पिंपरी महापालिकेस आणि 50 टक्के महसुल पिंपरी – चिंचवड पोलीस खात्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.
 
कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या. त्याचबरोबर अनेक नियमही बनवले. त्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, न थुंकणे असे नियम लागू केले. नियमांचे उल्लंघन केल्यास महापालिका प्रशासनाबरोबरच पिंपरी – चिंचवड पोलीसही संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करू लागले.
 
कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 15 पोलीस स्टेशन, तीन पोलीस चौकी आणि 10 वाहतूक विभागामार्फत कोरोना संकटकाळात विना मास्क फिरणा-यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये मास्क न वापरणा-या बेशिस्त नागरिकांकडून कोट्यावधीचा दंड वसूल करण्यात आला आहे.
 
पिंपरी – चिंचवड पोलीस विभागामार्फत मास्क सक्तीबाबत दंडात्मक कारवाई करून जमा झालेल्या 100  टक्के महसुलापैकी 50 टक्के महसुल पिंपरी – चिंचवड महापालिकेस आणि 50 टक्के महसुल पिंपरी – चिंचवड पोलीस खात्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला महापालिका सभेने मान्यता दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments