Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pune Bus Accident महामार्गावर बसचा भीषण अपघात, दोन महीलांचा मृत्यू, 30 जखमी

Webdunia
गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (15:05 IST)
Pune Bus Accident पुणे महामार्गावर बसचा दौंड तालुक्यातील पाटस येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर असून 30 प्रवाशी जखमी झाल्याची बातमी आहे. सत्याभामा बोयने आणि श्वेता पंचाक्षरी अशी मयतांची नावे आहेत तर बाळासाहेब शिरखाने हे गंभीर जखमी आहेत.
 
गुरुवारी पहाटेच्या सुमारास पुणे सोलापुर महामार्गाने लातुरहुन पुण्याकडे जाणारी बस रस्त्याच्या बाजुला उभ्या असणार्‍या सिमेंट वाहतुकीच्या ट्रकला धडकल्याने हा भीषण अपघात झाला.
 
याबाबत पाटस पोलिस चौकीहून मिळालेल्या माहितीनुसार लातुरहुन एक बस पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाने पुण्याकडे जात असताना दौंड तालुक्यातील पाटस घाटात रस्त्यात बंद पडलेल्या सिमेंट वाहतुकीच्या ट्रकला धडकली. अपघातात बसच्या डावीकडील भागाचा चुराडा झाला. यावेळी दोन महीला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीस जण जखमी झाले त्यापैकी एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
 
यावेळी नागरीकांच्या मदतीने बसमधील जखमी व्यक्तींना तत्काळ बाहेर काढुन उपचारासाठी पाठवण्यात आले तर मृत व्यक्तींना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

माझ्या मुलाला आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

माझी चूक एवढीच आहे, अजित पवारांनी व्हिडिओ संदेश जारी केला

ठाण्यात अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण, न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

सर्व पहा

नवीन

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

पुढील लेख
Show comments