पुण्यात कोरोनाचे प्रमाण अधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कठोर निर्बध लागू केले आहे. तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत अत्यावश्यक, जीवनावश्यक दुकाने वगळता अन्य दुकानाला प्रशासनाने परवानगी दिली नाही. पुणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागातील बिअर बार आणि वाइन शॉपच्या दुकानांमधून घरपोच (Home delivery) मद्य विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, मद्यविक्री घरपोच पार्सल सुविधा सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत राहणार आहे. आणि शनिवार आणि रविवारी मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर गेल्या टाळेबंदीत बिअर बार बंद ठेवण्यात आले होते. तर वाइन शॉपमधून विक्रीला परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी मद्य खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या २ एप्रिलपासून बिअर बार आणि वाइन शॉपमधून मद्य विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर परिणाम झाला आहे.
दरम्यान, गेल्या लॉकडाउनमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइन शॉपमधून MRP दराने ऑनलाइन मद्यविक्रीला परवानगी दिली होती. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. या वेळी संबंधित बार किंवा वाइन शॉपबाहेर दिलेल्या किंवा त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉल करून मद्य मागवावे लागणार आहे. होम डिलिव्हरीसाठी वेगळे चार्जेस लागतील की नाही, हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही.