Marathi Biodata Maker

विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार नाही

Webdunia
गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (14:46 IST)
गणेश विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले. त्यामुळे मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदांमध्येच श्रींचे विसर्जन करावे लागणार आहे.
 
दरवर्षी गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती श्रींचे विसर्जन नदीत करण्यात येते. मात्र, यंदा धरणामधून पाणी सोडण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण पाणीसाठा २९.०२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.५७ टक्के झाला आहे. चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला असतानाही गणेश विसर्जनासाठी यंदा पाणी सोडण्यात येणार नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या, नंतर अपघाताचे खोटे नाटक रचले

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

DC vs GT: शुभमन गिलचे शानदार पुनरागमन, कर्णधार गुजरातला दिल्लीविरुद्ध २१० धावांपर्यंत पोहोचवले

एअर गनने व्यक्तीच्या गुप्तांगात हवा भरली; अंतर्गत अवयव फाटल्याने मृत्यू, आरोपीला अटक

राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची शिकार! वन्यजीवांची कातडी आणि शरीराच्या अवयवांच्या तस्करी प्रकरणी ६ आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments