Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दसऱ्याच्या दिवशीच 1 कोटींचं सोनं चोरीला गेले

Webdunia
शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (17:47 IST)
एका कामगाराने ऐन दसरा सणाच्या मुहूर्तावर 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपयांची एवढी जबरी चोरी केल्यानं पिंपरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरीची घटना उघडकीस येताच, ज्वेलर्स दुकानाच्या मालकाने त्वरित चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत, आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत. 
 
मुकेश तिलोकराम सोलंकी असं गुन्हा दाखल झालेल्या 30 वर्षीय कामगाराचं नाव आहे. तो चिखली परिसरातील मोरेवस्तीवरील रहिवासी आहे. पण त्याचं मुळगाव राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आहे. आरोपी सोलंकी हा चिखली येथील श्री महावीर ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून काम करत होता. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपीनं दुकानातील तब्बल 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी श्री महावीर ज्वेलर्सचे मालक जितेंद्र अशोक जैन (वय-35, रा. निगडी) यांनी शनिवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर बंदी

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर स्थगिती, समर्थकांनी केला गोंधळ

पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर महायुतीत गोंधळ, गोगावले यांनी आदिती तटकरेंविरुद्ध मोर्चा उघडला

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीबद्दल सत्य हे आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खुलासा

लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सातवा हप्ता कधी येणार याचा खुलासा केला अजित पवारांनी

पुढील लेख
Show comments