Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळला; काय काळजी घ्याल?

Webdunia
गुरूवार, 16 नोव्हेंबर 2023 (16:02 IST)
झिका व्हायरसचं इन्फेक्शन झालेला एक रुग्ण पुण्यात आढळला आहे. पुण्याचा येरवडामध्ये प्रतीक नगर परिसरात हा रुग्ण आढळला आहे.
 
झिकाचा संसर्ग झालेली ही 64 वर्षांची महिला आहे. या महिलेला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तपासणीमध्ये तिला झिकाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं.
 
याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर भगवान पवार म्हणाले,
 
"या महिलेने केरळमध्ये प्रवास केला होता. तिथून त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर उपचार होऊन त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
आम्ही परिसरातील इतर लोकांचे सँपल घेतले आणि तपासणी केली आहे. त्यात आम्हाला कोणाला संसर्ग झाल्याचं आढळलं नाही. तसंच आम्ही परिसरात देखील फवारणी केली आहे. सध्या काळजी करण्यासारखं कोणतंही कारण दिसत नाही".
 
एडीज प्रकारचा डास चावल्याने हा रोग पसरतो. याच डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनियाही पसरतो. पण हा आजार जीवघेणा नाही.
 
झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची पाळी शक्यतो येत नाही. पण तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. या बाळांचं डोकं जन्माच्या वेळी नेहमीपेक्षा लहान असू शकतं.
 
झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे. या विषाणूमुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. तसंच गुलियन-बॅरे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे पसरण्याची शक्यता असते.
 
प्रामुख्याने हा व्हायरस डासांमार्फत पसरतो, असं म्हटलं जात असलं तरी काही प्रमाणात त्याचा संसर्ग लैंगिक संबंधामार्फतही होत असल्याचं दिसून आलं आहे.
 
डास चावल्यानंतर काय होतं?
किमशिल्थ हॉस्पिटलमधील संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. मोहम्मद नियास सांगतात, "झिका व्हायरस केवळ डास चावल्यामुळे पसरत नाही. पण, ब्लड ट्रान्सफ्यूजनमधूनही हा पसरण्याची शक्यता असते. तसंच लैंगिक संबंधांमधून हा व्हायरस पसरू शकतो."
 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसचे न्युरो-व्हायरलॉजीचे प्राध्यापक डॉ. व्ही. रवी सांगतात, "डास चावल्याच्या आठवडाभरानंतर लक्षणं दिसू लागतात. काही रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर म्हणजेच मज्जासंस्थेशी निगडीत गुंतागुंत होऊ शकते. हा एक ऑटोइम्यून आजार आहे."
 
"म्हणजे शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळेच निर्माण होतो. याला गिलियन-बॅरे सिंड्रोम म्हणतात. यामध्ये शरीरातली प्रतिकारकशक्ती आपल्याच पेशींवर हल्ला करू लागते. यामुळे पक्षाघात होऊन शरीराचा खालचा भाग लुळा पडू शकतो."
 
डॉ. रवी सांगतात, "भारतात पहिल्यांदाच झिका व्हायरसचा क्लस्टर सापडला होता. जर एकाच ठिकाणी एखाद्या संसर्गाची पाचहून अधिक प्रकरणं आढळत असेल तर त्याला संसर्गजन्य रोगाच्या बाबतीत क्लस्टर संबोधलं जातं."
 
झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत?
झिकाची लागण झाल्यास मृत्यूचं प्रमाण कमी असतं. दर पाच संसर्गजन्य लोकांमध्ये एका व्यक्तीत झिकाची लक्षणं आढळतात.
 
हलकासा ताप
डोळे लाल होणे आणि सुजणे
डोकेदुखी
पायांचे गुडघेदुखी
शरीरावर लाल चट्टे येणे
आतापर्यंत या व्हायरसवर ना कोणती लस आली आहे, ना कोणतं औषध उपलब्ध आहे. यामुळे रुग्णांना अधिकाधिक आराम आणि द्रवरुपी पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो.
 
पण, या व्हायरसचा परिणाम गर्भात असलेल्या मुलावर होतो, ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये मेंदूची अपुरी वाढ झालेल्या बाळांचा जन्म होण्याची शक्यता असते. यास्थितीला मायक्रोसेफली असं म्हणतात.
 
झिका व्हायरस पहिल्यांदा कुठे आढळला?
झिका व्हायरस पहिल्यांदा युगांडाच्या झिका जंगलात आढळून आला होता. त्यावेळी हा व्हायरस माकडांमधून माणसात दाखल झाल्याचं सांगितलं जातं.
 
1952 साली पहिल्यांदाच झिका व्हायरसची नोंद घेतली गेली.
 
संशोधकांच्या मते भारतातील नागरिक मोठ्या संख्येने कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेले आहेत. 196 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 33 रुग्णांमध्ये झिका व्हायरसबाबत प्रतिकारशक्ती तयार झाल्याचं सांगितलं जातं.
 
1953 रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालात भारतात झिका व्हायरसची नागरिकांना लागण होत असते, हे निदर्शनास आलं होतं.
 
2016 आणि 2017 मध्ये अहमदाबाद शहरात झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: अतिआत्मविश्वासामुळे निवडणूक हरलो-शरद पवार

शरद पवारांनी आपली चूक केली मान्य, म्हणाले- अतिआत्मविश्वासामुळे निवडणूक हरलो

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचे दोन दावेदार, आज फडणवीस, शिंदे, पवार हेअमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊ शकतात

ठाण्यामधील अंबरनाथच्या फार्मा कंपनीला भीषण आग

ठाणे रेल्वे स्टेशनवर महिलेने सुरक्षा रक्षकावर केला हल्ला

पुढील लेख