Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘पुणे दर्शन’ व ‘रातराणी’ बससेवा रविवारपासून पुन्हा सुरु होणार

‘पुणे दर्शन’ व ‘रातराणी’ बससेवा रविवारपासून पुन्हा सुरु होणार
, शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (08:37 IST)
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (PMPML) पुणे दर्शन व रातराणी बससेवा रविवारपासून (दि.24) पुन्हा सुरु होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च 2020 पासून पुणे दर्शन व रातराणी बससेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पीएमपीएमएलच्या वतीने रातराणी व पुणे दर्शन बससेवा पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे दर्शन बससेवा पूर्वीप्रमाणेच एसी बसद्वारे पुरविली जाणार आहे. पुणे दर्शन बससेवेंतर्गत केसरीवाडा, शनिवारवाडा, केळकर संग्रहालय, चतुश्रुंगी माता मंदिर, आंबेडकर वस्तुसंग्रहालय, पु.ल.देशपांडे गार्डन, सारसबाग गणपती, कात्रज सर्पोद्यान, शिंदेछत्री वानवडी, युद्धभूमी (घोरपडीगाव कॉर्नर), आदिवासी वस्तू संग्रहालय, आगाखान पॅलेस या प्रेक्षणीय स्थळांची प्रवाशी नागरिक व पर्यटकांना सफर करता येणार आहे. पुणे दर्शन बससेवेसाठी फक्त 500 रूपये तिकीट आहे.

पीएमपीएमएलच्या डेक्कन व पुणे स्टेशन मोलेदिना येथील पासकेंद्रांवर पुणे दर्शन बसचे तिकीट बुक करता येईल. तसेच www.pmpml.org या वेबसाईट वरून देखील online बुकिंग करता येईल. पुणे दर्शन बस सकाळी 8.45 वा. पुणे स्टेशन व डेक्कन वरून सुटेल व सायंकाळी 5.30 वा. परत पुणे स्टेशन व डेक्कन या ठिकाणी प्रवाशी व पर्यटकांना पोहोच करेल.

पीएमपीएमएलची रातराणी बससेवा देखील रविवारपासून पूर्ववत सुरु होत आहे. कात्रज, पुणे स्टेशन, हडपसर, निगडी व भोसरी डेपोतून विविध मार्गांवर प्रवाशी नागरिकांच्या सोयीसाठी रातराणी बससेवा पुन्हा सुरु होत आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यातील नवले पुलाजवळील ‘सेल्फी पॉईंट’ येथे भीषण अपघात; 3 ठार तर 12 जखमी, दोघे चिंताजनक