Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rajasthan election news : मतदानासाठी दाखवला उत्साह, पंतप्रधान मोदींचे राजस्थानच्या मतदारांना आवाहन

Webdunia
शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (10:05 IST)
Rajasthan election news : राजस्थानमधील 200 जागांपैकी 199 जागांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, सचिन पायलट, सीपी जोशी यांच्यासह अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे.
करणपूर, गंगानगरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे मतदान स्थगित. या जागेवर नंतर निवडणूक होणार आहे.
 
राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील मतदारांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
 
पंतप्रधानांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, 'राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. माझी सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. या निमित्ताने राज्यातील सर्व तरुण मित्र जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
 
 राज्यात 36,101 ठिकाणी एकूण 51,507 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, तेथे 5,26,90,146 मतदार उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवतील.
 
राजस्थानमध्ये मतदानासाठी प्रचंड उत्साह आहे. भाजप नेत्या वसुंधरा राजे सिंधिया, अर्जुन राम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत, दिया कुमारी, बाबा बालकनाथ यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदान केले.
 
मुख्यमंत्री अशोक गेहलोत (सरदारपुरा), माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (झालरापाटन), माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (टोंक), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा (लक्ष्मणगढ), राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे आरएलपी संयोजक हनुमान बेनिवाल (खिवंसर) यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
 
राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत, मात्र 199 जागांवर मतदान होत आहे. काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनानंतर गंगानगर जिल्ह्यातील करणपूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मॉस्कोमध्ये ISIS च्या 2 कैद्यांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले

गुरपतवंत सिंग पन्नू प्रकरण : आरोपी निखिल गुप्ताला अमेरिकेत नेण्यात आलं, भारताच्या अडचणी वाढतील?

प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून लढणार निवडणूक, राहुल गांधी रायबरेली राखणार

राज्य सरकार ने उपोषणाला बसलेल्या ओबीसी नेत्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे -पंकजा मुंडे

राहुल गांधी रायबरेली तर प्रियंका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवतील खरगे यांची घोषणा

सर्व पहा

नवीन

वक्फ बोर्डाने हिंदू-आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा आरोप

प्राण्यांमध्ये जाणिवा असतात का, त्यांना ही भाव-भावना असतात का?

मुंबईतल्या 'या' काॅलेजमध्ये हिजाब, बुरखा, नकाबवर बंदी; 9 विद्यार्थिनींची कोर्टात धाव

मनोज जरांगेंनंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू, सरकारच्या शिष्टमंडळाकडून दोघांनाही 'हे' आश्वासन

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांशी मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments