Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

…अन् भाजपच्या छत्र्या दुरुस्तीसाठी काँग्रेस भवनात ! नाना पटोलेंकडून भाजप नेत्यांची पोलखोल

Webdunia
शनिवार, 19 जून 2021 (08:03 IST)
पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये मोफत छत्री दुरुस्ती उपक्रमाचा बॅनर लागला.राज्यभरात काँग्रेसच्या या उपक्रमाची खिल्ली उडवण्यात  आली. परंतु  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे काँग्रेसची वाह…वाह व्हायला लागली आहे. याचे कारणही तेवढेच गमतीदार आणि खिल्ली उडवणाऱ्यांना चपराक देणारं आहे. झाले  ते म्हणजे असं की, काँग्रेसच्या मोफत छत्री दुरुस्ती उपक्रमात पुण्यातील काँग्रेस भवनात चक्क भाजपची छत्री आली . या छत्रीवर भाजप नेते गिरीश बापट यांचं नाव आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोटो शेअर करत या उपक्रमाचे खिल्ली उडवणाऱ्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
 
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे पुण्यातील काँग्रेस भवन येथे मोफत छत्री दुरुस्ती उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपक्रमाचे आयोजक मोहन जोशी आहेत. सध्या याच ठिकाणी १४ ते १९ जूनपर्यंत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे बॅनर आणि जाहिरात पुणे शहरात करण्यात आल्यावर विरोधक आणि नेटकऱ्यांनी या उपक्रमाची खिल्ली उडवली होती. परंतु या उपक्रमाचा आतापर्यंत शेकडोहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. शेकडो नागरिकांनी आपल्या नादुरुरुस्त आणि जून्या छत्र्या दुरुस्त करुन घेतल्या आहेत. 
 
भाजपच्या नेत्यांकडून या उपक्रमावर खिल्ली उडवण्यात आली होती. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत या उपक्रमाची खिल्ली उडवली होती. सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छता खाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा…या होर्डिंग च्या किमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या, असं ट्विट करुन भातखळकर यांनी करुन खिल्ली उडवली होती. परंतु काँग्रेसच्या या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत १०० हून अधिक नागरिकांनी आपल्या छत्र्या दुरुस्त करुन घेतल्या आहेत.
पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये मोफत छत्री दुरुस्ती उपक्रम राबवण्यात येत आहे. यामुळे मोहन जोशी यांनी उपक्रमाला सुरुवात केली असून सध्या याच ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येत असून पुढील काही दिवसांत पुण्यातील एकूण ८ मतदारसंघात राबविण्यात येणार आहे. 

संबंधित माहिती

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

पुढील लेख
Show comments