Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १० वर्षे अत्याचार; तीन वेळा गर्भपात..

Webdunia
सोमवार, 24 जानेवारी 2022 (08:27 IST)
नाशिक शहरात संताप  घडवणारी घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर तब्बल १० वर्षे लैंगिक अत्याचार करून तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की 30 वर्षीय पीडित महिलेस संशयित आरोपी गणेश राजाराम भोसले (वय 34, रा. महालक्ष्मी बंगलो, खोडेनगर, नाशिक) याने दि. 12 सप्टेंबर 2012 ते दि. 21 जानेवारी 2022 या कालावधीत वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले.
 
संशयित भोसले याने या महिलेला त्याच्या उपनगर येथील घरी, औरंगाबाद नाक्यावरील शिवगंगा हॉटेल, उपनगर येथील शालम् हॉटेल, इगतपुरी येथील मँगो रिसोर्ट, तपोवन मैदान अशोका मार्ग मैदान, आणि अशोका मार्ग येथील त्याच्या राहत्या घरी नेऊन वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर संशयित भोसले याने या महिलेला नकळत दारू पाजून तिचे न्यूड फोटो व व्हिडिओ काढून ते नातेवाईकांना सोशल मिडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या.
 
तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर अश्‍लील चॅट करून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. फिर्यादी महिलेचा विरोध असतानाही अनैसर्गिक संबंध ठेवून फिर्यादी यांचा लैंगिक छळ केला, तसेच फिर्यादी महिलेचा तीन वेळा जबरदस्तीने गर्भपात करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. दरम्यान या प्रकाराला कंटाळून महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी, 100 हून अधिक जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments