rashifal-2026

बारावीचे विद्यार्थी पेपरमध्ये गुंग असतांना बाहेर चोरट्यांनी डाव साधला! ११ मोबाईल लंपास

Webdunia
गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (09:16 IST)
नाशिक : सध्या विद्यार्थी बारावीच्या परीक्षेच्या टेन्शन मध्ये असताना त्यांचे टेन्शन आणखी वाढवणारी घटना घडली आहे. वर्गात इंग्रजीचा पहिलाच पेपर सुरू असताना अज्ञात व्यक्तीने बाहेरून विद्यार्थ्यांचे ११ मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नाशिकरोड परिसरातील के. जी महेता हायस्कूल, बिटको कॉलेज, जयराम भाई हायस्कुल येथे घडली आहे. विद्यार्थी पेपरमध्ये गुंग असताना बाहेर हा प्रकार घडला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत अधिकची माहिती अशी की, सध्या राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू असून विद्यार्थी आधीच त्या व्यापात आहेत. काल मंगळवारी विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पहिलाच पेपर झाला. मात्र पेपर झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंग्रजीचा पेपर सकाळी 11 वाजता होता. बिटको महाविद्यालय, के. जी. मेहता हायस्कूल, जयरामभाई स्कूल येथे पेपर देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कॉपी विरहित परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयाकडून त्यांच्या बॅग वर्गात नेण्यास परवानगी नव्हती.
 
त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मोबाईल बॅगमध्ये ठेवून ती बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. तर काही विद्यार्थ्यांनी वह्या पुस्तके व मोबाईल असलेली बॅग शाळा, महाविद्यालयाच्या बाहेर ठेवली होती. दुपारी दोन वाजता पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी बॅगा व दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली बॅग घेण्यासाठी गेले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांचे ११ मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले.
 
यानंतर विद्यार्थांनी थेट पोलीस ठाणे गाठले, या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बारावीला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना सोबत मोबाईल आणू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

नागपुरातील गडकरी जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थित; अपंगांनी व्यक्त केली कृतज्ञता

Maharashtra Winter Session नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू; प्रत्येक मुद्द्यावर होणार चर्चा

Winter Session सरकार १८ विधेयके मांडणार, फडणवीस यांनी विरोधकांच्या बहिष्काराला प्रत्युत्तर दिले

LIVE: महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे; सरकार १८ विधेयके मांडणार

नागपूर: अस्थी विसर्जनादरम्यान जळत्या लाकडाने हल्ला, ६ जण जखमी

पुढील लेख
Show comments