rashifal-2026

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये निधी राज्य सरकारकडून वितरीत

Webdunia
शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (20:31 IST)
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये निधी राज्य सरकारकडून वितरीत करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पगारावरुन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारनं तातडीनं हे पाऊल उचललं आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून एक परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. 
 
सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तीनशे कोटी रुपये वितरीत केले आहेत. यात कर्मचाऱ्यांचा फक्त नेट पगार होईल, त्यात गॅच्युटी, पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. तसंच कर्मचाऱ्यांचा आजच पगार होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सरकारने ३०० कोटी निधी वितरित केलेला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आता होणार आहे. या निधीतून त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार आहे.
 
एसटी संप काळात कर्मचाऱ्यांचे वेतन सात ते 10 तारखे दरम्यान देण्याचं आश्वासन राज्य सरकारने कोर्टात दिलं होतं. मात्र तरीही गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर पगार होत नाही. यामध्ये याही महिन्यात १२ तारीख उलटली तरीही पगार न झाल्याने कर्मचारी संतप्त होते. एसटी कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. 
 
सरकारनं दिलेली रक्कम अपुरी
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारनं ३०० कोटी रुपये दिले असले तरी दिलेली रक्कम अपुरी असल्याचं काँग्रेस प्रणित एसटी संघटनेचे म्हणणे आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत व्हावा यासाठी दरमहा ३६० कोटी रुपये देणे गरजेचे आहे. तशी हमी राज्य सरकारने कोर्टात दिली होती. तरीही दर महिन्याला सरकारकडून अपुरा निधी दिला जात आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांची थकलेली देणी १ हजार २०० कोटींच्या घरात गेली आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

तामिळनाडूतील शिवगंगा येथे दोन बसची धडक; अपघातात 11 जणांचा मृत्यू

LIVE: गडचिरोलीमध्ये ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

नागरी निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगावर नाराज

LPG गॅस सिलिंडर स्वस्त झाला

"खरे मारेकरी संसदेत बसले आहे" असे म्हणत काँग्रेस खासदार भवन संकुलात कुत्रा घेऊन पोहोचल्या

पुढील लेख
Show comments