Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी 5 कोटींचा निधी मंजूर

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (20:11 IST)
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शिवसृष्टीच्या उर्वरित विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे येवला शिवसृष्टीचे सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होणार असून येवल्याच्या वैभवात अधिक भर पडणार आहे.
 
भुजबळ यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेल्या येवला शिवसृष्टी प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन निधी अंतर्गत 2 कोटी रुपये व प्रादेशिक पर्यटन विभागाकडून 4 कोटी असे एकूण 6 कोटीचा निधी या अगोदरच मंजूर करण्यात आला असून प्रकल्पाचे काम देखील सुरु आहे.

या प्रकल्पासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील प्रतिकृती असलेल्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्याचे काम कुडाळ येथे पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सदनात बसविण्यात आलेले पुतळे ज्या कारागिरांनी घडविले आहे त्यांच्याच हातून हा पुतळा बनविला जात आहे. आता या प्रकल्पातील उर्वारीत कामासाठी आता प्रादेशिक पर्यटन योजनेच्या माध्यमातून पुन्हा 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यातील राहिलेली कामे पूर्ण होऊन लवकरच हा शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण होणार आहे.
 
येवला शिवसृष्टीमध्ये या कामांचा असेल सामावेश..
येवला शिवसृष्टी प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील प्रतिकृती असलेला सिंहासनाधिष्टीत पुतळा, शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित म्युरल्स, आर.सी.सी गॅलरी, म्युझियम, कॅफेटेरिया,आर.सी.सी बुरुज,ओ.व्ही हॉल, पर्यटन सुविधा केंद्र, विक्री केंद्र, इतर अनुषंगिक पुतळे, स्वच्छतागृह, लँडस्केपिंग, गार्डनिंग,पेंटीग्ज, पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रकल्प, आग्निप्रतिबंधक यंत्रणा, इलेक्ट्रीक कामे, सुशोभिकरणाची कामे या कामांचा समावेश असणार आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवारांनी केली शरद पवारांच्या तब्बेतीची विचारपूस

मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी पंकजा मुंडे जाणार

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जळगावला 730 कोटींचा निधी मंजूर

अजित पवारांनी शरद पवारांना फोन करुन तब्बेतीची विचारपूस केली

इस्रायलकडून युद्धबंदी कराराचे उल्लंघन, गाझा पट्टीवर गोळीबारात एक पॅलेस्टिनी ठार

पुढील लेख
Show comments