Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पालघर मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी 50 वर्षीय आरोपीला अटक

rape
, शनिवार, 4 जानेवारी 2025 (16:37 IST)
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात सातिवली परिसरात एका 50 वर्षीय फर्म मालकाला 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. या घटनेची माहिती वाळिव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना 31 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 दरम्यान घडली असून आरोपीने आपल्या फर्म मध्ये काम करणाऱ्या मुलीला फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीने आपल्या कुटुंबियांना घडलेले सांगितले नंतर आरोपीच्या विरुद्ध वळीव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय  तपासणी केली आहे. 

आरोपी फर्म मालकाच्या विरोधात लैंगिक अत्याचार करणे आणि पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्कार आणि इतर गुन्हांचा आरोप दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युझवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोट होणार? इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले