Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्राच्या 6 खासदारांना मिळाली ही खाती!

India
Webdunia
मंगळवार, 11 जून 2024 (13:04 IST)
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्ववाली सरकारमध्ये शिवसेना प्रतापराव जाधव आणि माजी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या समवेत महाराष्ट्रामधून या 6 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री रूपात शपथ ग्रहण केली. 
 
नितीन गडकरी- यांना परिवहन आणि रस्ते विकास हे खाते देण्यात आले आहे. नितीन गडकरी हे 2014 मध्ये पहिल्यांदा नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढले आणि जिंकले देखील. तेव्हा पासून त्यांनी मोदी सरकारमध्ये अनेक मंत्रालयाची जवाबदारी निभावली आहे. पूर्ण देशात त्यांनी मोठे मोठे हायवे निर्माण कार्य करून विकासाला एक नवीन दिशा दिली आहे. 
 
पियुष गोयल- यांना वाणिज्य खाते देण्यात आले आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोदी सरकारमध्ये विभिन्न मंत्रालयाची जवाबदारी पियुष गोयल निभावत आहे. पियुष गोयल हे चार्टड अकाउंटन्ट आहेत. पियुष गोयल हे उत्तर मुंबई सीट मध्ये जिंकून पहिल्यांदा लोकसभा मध्ये पोहचले. ततपूर्वी ते राज्यसभा सदस्य देखील होते. 
 
रामदास आठवले- यांना समाजिक न्याय आणि अधिकारीता हे खाते देण्यात आले आहे. महाराष्ट्रच्या राजनीतिचे एक प्रमुख दलित चेहरा रामदास आठवले देखील मोदी सरकार मध्ये तिसऱ्यांदा मंत्री बनत आहे. हे राज्यसभा सदस्य आहे. 
 
रक्षा खडसे- यांना क्रीडा आणि युवक कल्याण हे खाते देण्यात आले आहे. सरपंच पासून आपली राजनीतिची सुरवात करणाऱ्या रक्षा खडसे महाराष्ट्रच्या रावेर सीट मधून तिसऱ्यांदा लोकसभा सदस्य झाल्या आहे. पण आता पहिल्यांदाच त्यांना मोदी कॅबिनेट मध्ये महाराष्ट्रमधून एकमात्र महिला मंत्रीच्या रूपात सहभागी करण्यात आले आहे.  
 
मुरलीधर मोहोल- यांना सहकार आणि नागरी उड्डाण हे खाते देण्यात आले आहे. पुण्यामधून पहिल्यांदा निवडले गेलेले मराठा नेता मुरलीधर मोहोल यांनी आपले सार्वजनिक जीवन सुरवात पुणे मधील एका गणेश मंडळातून केली होती. या नंतर तर चार वेळेस पुणे महानगरपालिकाचे सभासद निवडले गेले आणि पुणे महापौर देखील होते. 
 
प्रतापराव जाधव- यांना आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण ही खाते देण्यात आले आहे. महाराष्ट्र मधून मित्रदलांकडून मंत्री बनणारे प्रतापराव जाधव एकमात्र व्यक्ति आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  तीन वेळेस निवडले गेलेला आपला मुलगा डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या ऐवजी प्रतापराव जाधव यांचे नाव पुढे केले. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांनी समन्स बजावले; या दिवशी उपस्थित राहावे लागेल

LIVE: 'सौगत-ए-मोदी' नाहीये हे सत्ता जिहाद आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

'त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या, त्याला प्रसाद द्यायला हवा', कुणाल कामराच्या नवीन व्हिडिओवर मंत्री शंभूराज संतापले

मांजरीला घाबरून पळाली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली, चिमुरडीचा वेदनादायक मृत्यू

संविधान कोणीही बदलू शकत नाही... महात्मा गांधींचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'राम राज्य'वर काय म्हटले?

पुढील लेख
Show comments