rashifal-2026

नागपुरात सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार

Webdunia
रविवार, 26 ऑक्टोबर 2025 (14:34 IST)
नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षाच्या मुलीला लॉजवर नेऊन तिच्या वर दोघांनी बलात्कार केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी मुलीचे बलात्कार करतानाचे व्हिडीओ बनवून तिला धमकावले आहे. अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. 
ALSO READ: पालघर: वाडा जवळील जंगलात महिलेसोबत सामूहिक दुष्कर्म, एका आरोपीला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जवळील भिलगाव परिसरात गुरुवारी सदर घटना घडली. 
दोन्ही आरोपी मुलीला लॉजवर घेऊन गेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेचे व्हिडीओ बनवून त्यांनी मुलीला कोणालाही हे सांगायचे नाही, व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी दिली. 
ALSO READ: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी उपनिरीक्षकाला अटक
मुलीने घरी आल्यावर घडलेलं सर्व कुटुंबियांना सांगितले. तिच्या पालकांनी हे कळल्यावर तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दोन्ही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली.
ALSO READ: पत्नीशी झालेल्या भांडणानंतर पतीने स्वतःच्या जुळ्या मुलींचा गळा चिरला, बुलढाणा मधील घटना
पोलिसांनी आरोपींवर बलात्कार, पॉक्सोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. हे दोन्ही आरोपी गुन्हेगारीच्या क्षेत्राचे असून त्यांच्यावर या पूर्वी देखील अनेक गुन्हा दाखल केले आहे. पोलीस या प्रकरणी लॉजच्या मालकाशी चौकशी करण्यात असल्याचे सांगितले आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments