Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल

Webdunia
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (12:26 IST)
मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगेंनी एकेरी आणि अपशपब्द तसेच खालच्या भाषेत टिका केल्यामुळे राज्य सरकार ज्याने आता पर्यंत सबुरीचे धोरण बाळगले होते. ते आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.  मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण पहिल्यांदाच सोमवारी मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
राज्यसरकारकडून जवळपास कालपासून 1041 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच रास्ता रोको आंदोलनासाठी लोकांना प्रवृत्त केल्या बद्द्ल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दिलेल्या माहितीनुसार, बीड मध्ये मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली व त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.आंदोलकांनी रास्ता रोक आंदोलन केल्यामुळे बीडमधील सामान्य जनतेला वाहतूक कोंडिला सामोरे जावे लागले. 

जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे अज्ञाताने एसटी महामंडळाची बस पेटवल्याची माहिती समोर आली आहे.तीर्थपुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य परिवहन महामंडळाची अंबड आगाराची अंबड वरून आलेली अंबड- रामसगाव बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे.
 
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील सर्व बस बंद करण्यात आलेल्या आहे. पुढील आदेशापर्यंत जालना जिल्ह्यातील बस बंद राहतील अशी माहिती विभागीय नियंत्रक प्रमुख नेहुल यांनी दिली.
Edited By- Dhanshree Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मनोज जरांगे पाटील फॅक्टर किती परिणामकारक ठरणार?

महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या गाडीला अपघात

हरियाणात नायब सैनी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जागावाटपाबाबत अखिलेश यादव यांचे मोठे वक्तव्य, सपा प्रमुख उद्या मुंबईला जाणार

Jharkhand माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचे खुले पत्र, झारखंडच्या पुनर्रचनेसाठी तरुणांना हे आवाहन

पुढील लेख
Show comments