Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोदाघाटावर साकारली तब्बल २५ हजार चौरस फुटांची भव्य महारांगोळी!

Webdunia
सोमवार, 18 एप्रिल 2022 (08:38 IST)
येथील पाडवा पटांगण, (जुने भाजी मार्केट), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी येथे २५ हजार स्क्वेअर फुटांची (२५० फूट बाय १०० फूट) ही भव्य रांगोळी साकारण्यात आली असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महान जनजातीय स्वातंत्र्यवीर प्रत्येकाला आवर्जून समजावे या उद्देशाने नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक तर्फे तब्बल २०० हुन अधिक महिला कलाकार व ललित कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे येऊन ही रांगोळी साकारली होती. एकूणच सकारात्मक ऊर्जेने ‘मी’ चे ‘आम्ही’ मध्ये परावर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
 
वर्षानुवर्षाच्या उपेक्षेमुळे काहीसा दुर्लक्षित व तत्कालीन इतिहासात तेजोभंग करण्यात आल्याने मागे पडलेला जनजाती समाज आज मात्र कात टाकल्याप्रमाणे एका नव्या चैतन्याने प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होताना दिसत आहे. समाजातील व्यापून टाकणारी नवनवीन क्षेत्रे ज्या गतीने व उत्साहाने हा समाज पादाक्रांत करतांना दिसत आहे, ती पाहता हाच का तो समाज ? असा प्रश्न पडून आपल्याला सार्थ अभिमान वाटतो.

स्वातंत्र्य लढ्यातील जनजाती समाजाचे योगदान अनुभवताना साध्या भोळ्या वाटणाऱ्या सामान्य दिसणाऱ्या जनजाती तरुणांनी जो अचाट पराक्रम गाजवला, आपल्या या धरतीमातेच्या रक्षणासाठी – तिच्यावर आलेल्या परकीय संकटाचे निवारण करण्यासी ज्या उत्कट देशभक्तीचा परिचय दिला. त्याला इतिहासात खरोखर तोड नाही.

जनजाती समाजाबद्दलची कृतज्ञता शतपटीने वाढेल असे एकापेक्षा एक सरस योद्धे भूमीने अनुभवल्याचे दिसते. म्हणूनच या वर्षीची जनजातीय वीर योद्धयांना समर्पित ‘महारांगोळी’ म्हणजे क्रांतिकारक खाज्या नाईक , राजा जगतदेव सिन्हा, राणी दुर्गावती, बाबुराव शेडमाके, राणा पुंजा भिल, नाग्या कातकरी, तंट्या भिल, राघोजी भांगरे, राणी गाईडीनल्यु, क्रांतिकारक भागोजी नाईक आणि भगवान बिरसा मुंडा अशाच काही जनजाती योध्दांचा परिचय करून देण्याचा एक अल्पसा प्रयत्न करण्यात आला आहे.

रांगोळीच्या पोर्ट्रेट सोबतच या योद्धयांचे माहिती फलक देखील तेथे लावण्यात आले आहे. जनजातीय वीरांचा हा वारसा शहरातील नागरीकांसमोर मांडण्याचा व त्यातून शहरवासी, वनवासी, आम्ही सारे भारतवासी हा संकल्प दृढ करण्यासाठी या महारांगोळीचे प्रयोजन करण्यात आले होते.या महा रांगोळी साठी एकूण ३००० किलो रंग आणि २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून १५० महिलांनी तीन तासांत ही रांगोळी साकारली आहे.

या महारांगोळीची संकल्पना पूर्णत्वास उतरवण्यासाठी निलेश देशपांडे आणि तुषार मिसाळ व वनवासी कल्याण आश्रम, नाशिक विभागातील कार्यकर्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन होते.यावेळी सौ.भारती सोनवणे यांनी महारांगोळी प्रमुख म्हणून काम पहिले तर सौ. मंजुषा नेरकर व सौ.सरोजिनी धानोरकर यांनी सहप्रमुख म्हणून काम पहिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

32 वर्षीय व्यक्ती कडून 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार मुंबईतील घटना

पुढील लेख
Show comments