Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपाच्या माजी आमदाराच्या बंद बंगल्यात सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह

Webdunia
शनिवार, 31 डिसेंबर 2022 (14:45 IST)
साताऱ्यात खळबळ! वाढे येथे मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तालुका पोलीस रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते. मृतदेहाबद्दल माहिती घेण्याचे काम सुरू होते. भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंद असलेल्या बंगल्याच्या परिसरात हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाढे येथे माजी आमदार कांताताई नलावडे यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास अर्धवट पुरलेल्या स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी नागरिकांनीही गर्दी केली होती.
 
बंगल्याच्या परिसराची साफसफाई करत असताना हा प्रकार समोर आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. यामुळे तो महिलेचा की पुरुषाचा ते अद्याप समजू शकलेले नाहीय. पोलीस आजुबाजुच्या लोकांकडे चौकशी करत आहेत.
 
सातारा तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत ते वाढे येथे होते. मृतदेह कोणाचा आहे, याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सुरू होते. तर वाढे येथे मृतदेह आढळून आल्याने बघ्यांची गर्दी झाली होती.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments