Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रवासी घेऊन जाणारा ट्रक पुरात वाहून गेला, तिघांचा मृत्यू

Webdunia
रविवार, 10 जुलै 2022 (14:13 IST)
सध्या राज्यात पावसाचा उद्रेक सुरु आहे. गडचिरोली  जिल्ह्यात प्रवासी घेऊन जाणारा ट्रक काल रात्रीच्या सुमारास अहेरी तालुक्यातील पेरमेली नाल्यात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरात वाहून गेल्या ट्रक मध्ये पाच ते सहा प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.ही माहिती प्रशासनाला मिळताच आज पहाटेपासून एसडीआरएफच्या पथकामार्फत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. शोध मोहीमेदरम्यान नाल्यात अडकून असलेल्या ट्रकमध्ये तीन मृतदेह सापडले आहेत. उर्वरीत प्रवाशांचा शोध सुरु आहे. उर्वरीत लोक हे सुरक्षीत आहेत की त्यांच्यासोबतही काहीअप्रिय घटना घडली आहेत. याबाबत एसडीआरएफ पथक शोध घेत आहेत. गावपातळीवर सक्रीय असलेल्या यंत्रणांनीही याबाबत शोधमोहीम सुरु केली आहे. 
<

#WATCH | Maharashtra | A flood-like situation occurred in different areas of the Gadchiroli district due to heavy rainfall in the region (09.07) pic.twitter.com/xbldjKwqsQ

— ANI (@ANI) July 10, 2022 >
पुरात वाहून गेलेले हे ट्रक कुठे जात होते , हे अद्याप समजू शकले नाही. ही घटना काल रात्री घडल्यामुळे आज पहाटेपासून एसडीआरएफ पथक, गावास्तरावरील यंत्रणा यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते भामरागडया राष्ट्रीय महारमार्गावरील कुमरगुडा आणि पेरमिली नाल्यावर पूरस्थितीनिर्माण झाल्याने हा मार्ग रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तशी माहितीही प्रशासनाने दिली होती. दरम्यान, गडचिरोलीत अतिवृष्टी झाली. या भागात नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments