Dharma Sangrah

मुंबईच्या धावत्या लोकल मध्ये तरुणीचा विनयभंग

Webdunia
शुक्रवार, 30 जून 2023 (11:40 IST)
आज जरी मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. तरीही त्यांच्या सुरक्षतेबाबत प्रश्न निर्माण होतात. देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाणारी मुंबईत महिला असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.काही दिवसांपासून लोकल मध्ये महिलालांना त्रास देणे, अश्लील चाळे  करणे आणि अश्लील बोलून महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडत आहे. मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोड जवळ धावत्या लोकलमध्ये एका 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या तरुणीच्या तक्रारी वरून तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर घटना पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोड जवळ एका धावणाऱ्या लोकल मधील आहे. मालाड येथे राहणारी एक 24 वर्षीय तरुणी रात्री चर्नी रोड ला प्रवास करत असताना लोकल मध्ये एका तरुणाने तिची छेड काढत अश्लील चाळे करून अश्लील वक्तव्य करत होता. तरुणीने आरडाओरड केल्यामुळे तरुणाने लोकलचा वेग कमी झाल्यावर रेल्वेतून उडी मारून पसार झाला. तरुणीने तरुणाच्या विरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्या तरुणाचा शोध घेत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

तिरुपतीच्या लाखो भाविकांची फसवणूक, मंदिर ट्रस्टला विकले 68 लाख किलो बनावट तूप

फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या घरी 350 किलो RDX, 2 AK47 सापडले, दहशतवादाशी संबंध उघड

आजपासून नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम

जपान : इवाते प्रांतात ६.७ तीव्रतेचा भूकंप

LIVE: उद्धव ठाकरे यांच्या घराजवळ ड्रोन दिसला, यूबीटीने 'पाळत ठेवल्याचा' आरोप केला

पुढील लेख