Festival Posters

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती

Webdunia
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांना परीक्षा देता येणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे.
 
या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जात आधार क्रमांक भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही त्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी आधार कार्ड सादर करायचे आहे. आधार कार्ड नसल्यास या वर्षी विद्यार्थ्यांना निकाल देणार नाही असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना  ७ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
 
ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अद्याप काढले नाही अशा विद्यार्थ्यांनी येत्या चार महिन्यांत आधार कार्ड तातडीने काढावे अशा सूचना सर्व शाळांना मंडळाकडून देण्यात येणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर बीड जिल्ह्यातील परळी शहरात धारदार शस्त्रांनी हल्ला

बकरीदच्या आधी मीरा रोडमध्ये गोंधळ, बकऱ्यांच्या बळीवरून दोन गटांमध्ये संघर्ष; पोलीस बंदोबस्त

बीडमध्ये शिंदे सेनेचे नेते शिवाजी शिंदे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला

RCB vs GT : आयपीएल २०२६ चा क्वालिफायर १ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू व गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे

१ जूनपासून सौर पॅनेल बसवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल: किमतींवर आणि 'पीएम सूर्य घर' अनुदानावर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments