rashifal-2026

विद्यार्थ्यांचे आधार नाही, शिक्षकांना पगार नाही

Webdunia
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (12:09 IST)

पुढील महिन्याभरात राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार काढून सरलमध्ये न भरल्यास शिक्षकांचे दिवाळीतील पगार रोखणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. मुख्य म्हणजे इयत्ता पहिली ते बारावीमधील 2 कोटी 24 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 75 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे आधार लिंक झाले आहे. तर 88 लाख 76 हजार विद्यार्थ्यांचे आधार तपासून घेणे बाकी असून 59 लाख 64 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्याप काढलेच नसल्याची आकडेवारी शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने 14 ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढत राज्याच्या विद्यार्थी, शिक्षक, शाळा, संस्था यांच्यासाठी असणाऱ्या सरल या संगणक प्रणालीमध्ये माहिती अपलोड करण्यास सांगितले आहे. विविध टप्प्यांवर भरण्यात येणाऱ्या या माहितीसाठी शिक्षण विभागाकडून मुदत ठरवून देण्यात आली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नाव, जात, जन्मतारीख, पत्ता या गोष्टींपासून आधार, शिक्षक मान्यता, शाळा नोंदणी या सगळ्याची माहिती शिक्षकांना सरल प्रणालीत भरण्यास सांगितले आहे.  शिक्षण विभागाचा हा सरलमध्ये माहिती भरण्याचा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे, मात्र अद्यापही राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, संस्थांची आणि शाळांची माहिती सरल वर आलेली नाही. त्यामुळेच शिक्षण विभागाने संस्थानोंदणीसाठी 31 ऑगस्ट, स्टाफ पोर्टल भरण्यासाठी 15 सप्टेंबर तर संचमान्यता आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बीड जिल्ह्यात नववीच्या एका विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

पुसदमध्ये तरुणाने स्वतःच्या मृत्यूची पोस्ट टाकत गळफास घेत केली आत्महत्या

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

2026 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

पुढील लेख
Show comments