Festival Posters

राज्यात अपघात कमी झाले, मात्र संख्या वाढली

Webdunia
सोमवार, 5 मार्च 2018 (10:35 IST)

गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील नऊ शहर- जिल्ह्य़ांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले आहे. त्यात विदर्भातील ४ जिल्ह्य़ांचा समावेश आहे. सर्वाधिक अपघात पुण्यात वाढले आहेत.  परिवहन खात्याकडे सादर झालेल्या एका अहवालानुसार वर्ष २०१७ मध्ये राज्यात अपघाताचे प्रमाण १०.०३ टक्क्यांनी कमी झाले आहे, परंतु शहरातील सर्व जिल्हे व शहरांची स्थिती बघता नऊ शहर-जिल्ह्य़ांत अपघात वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

वर्ष २०१३ आणि २०१४ मध्ये राज्यात अपघाताचे प्रमाण ०.४२ टक्क्यांनी कमी झाले होते, परंतु २०१५ मध्ये त्यात ३.५३ टक्के वाढ झाली. २०१६ मध्ये प्रथमच राज्यात ३७.५५ टक्यांनी अपघात कमी झाले. २०१७ मध्ये राज्यात १०.३ टक्क्यांनी अपघात कमी झाले असले तरी राज्यातील नऊ शहर- जिल्ह्य़ांमध्ये अपघाताची संख्या वाढल्याचे पुढे आले आहे. अपघात वाढलेल्या शहर- जिल्ह्य़ांमध्ये पुणे (ग्रामीण) ४.९२ टक्के, औरंगाबाद (ग्रामीण) १३.०८ टक्के, जालना ५.८८ टक्के, बीड- ११.४० टक्के, अकोला- १.२८ टक्के, भंडारा- ०.८७ टक्के, चंद्रपूर- ८.१९ टक्के, गडचिरोली- २५. ८७ टक्के, पुणे (शहर)- ९.५९ टक्के या भागांचा समावेश आहे. अपघात कमी झालेल्या भागात रायगड- १२.४१ टक्के, रत्नागिरी- १३.१२ टक्के, सिंधुदुर्ग- २८.२५ टक्के, ठाणे (ग्रामीण)- १२.१८ टक्के, पालघर १७.५८ टक्के, कोल्हापूर- ३५.९९ टक्के, सांगली- १४.७२ टक्के, सातारा- १९.१५ टक्के, सोलापूर (ग्रामीण)- ८.३६ टक्के, अहमदनगर ११.९३ टक्के, धुळे- ९.०७ टक्के, नंदूरबार- १५.४१ टक्के, नाशिक (ग्रामीण) २२.३२ टक्के या भागांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बीड जिल्ह्यात नववीच्या एका विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

पुसदमध्ये तरुणाने स्वतःच्या मृत्यूची पोस्ट टाकत गळफास घेत केली आत्महत्या

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

2026 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

पुढील लेख
Show comments