Dharma Sangrah

'आदित्य ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावून निवडून येऊन दाखवा- शीतल म्हात्रे

Webdunia
शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (09:43 IST)
खंजीर खुपसणं या शब्दाची व्याख्या आदित्य ठाकरे यांनी समजून घ्यावी. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावून पुन्हा निवडून येऊन दाखवावं, अशा शब्दांत माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं आहे.
 
शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "आदित्यजी, आपण आमदार झालात तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मते मागितली होती. त्यामुळे आपल्या आमदार होण्यामागे भाजपचीही मते आहेत. त्यामुळे राजीनामा द्यायचा असेल तर तुम्हीच द्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावून निवडून येऊन दाखवा."
 
"गेल्या अनेक दिवसांपासून पाठीत खंजीर खुपसणं, गद्दारी, विश्वासघात हे शब्द आम्ही आपल्या तोंडून ऐकत आहोत. खरंतर या शब्दांची व्याख्या समजून घेतली तर बरं होईल. आपण महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेत आला आहात. त्यामुळे मतदारांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला असेल तर तो आपण खुपसलाय. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन रामराज्य आणायचा प्रयत्न करत आहोत," असंही शीतल म्हात्रेंनी म्हटलं.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

LIVE: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात ३००० रुपये येणार

ब्रह्मपुत्र नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांपैकी पाच जण बेपत्ता

पुढील लेख
Show comments