Marathi Biodata Maker

बहुमत आहे, तोपर्यंत तुम्ही आमच्या केसालादेखील धक्का लावू शकत नाही : संजय राऊत

Webdunia
बुधवार, 24 मार्च 2021 (10:03 IST)
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेता देवेद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. तुम्ही कागदपत्रं घेऊन फिरत राहा. मात्र जोपर्यंत आमच्याकडे बहुमत आहे, तोपर्यंत तुम्ही आमच्या केसालादेखील धक्का लावू शकत नाही, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीस यांनी दिल्लीत गृह सचिवांची भेट घेतल्याबद्दल राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांना यातून आनंद मिळत असल्यास त्यांना आनंद घेऊ द्या. काही जण कागदपत्रं घेऊन येतात. काही जण फाईल आणतात. ठाकरे सरकारला काम करू द्या. हे सर्व करून सरकार कोसळणार नाही, असं राऊत पुढे म्हणाले.
 
ते जे कागद फडफडवताहेत त्या कागदपत्रांमध्ये काहीच नाही. गृह सचिवांना त्याचा अभ्यास करायचा असल्यास करू द्या. आम्हाला कोणतीही अडचण नाही, असा टोला त्यांनी लगावला. 'लोकशाहीत अनेकांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं. कोणाला पंतप्रधान व्हावंसं वाटतं. कोणाला गृहमंत्री व्हायचं असतं तर कोणाला राष्ट्रपती,' असा चिमटा राऊत यांनी काढला. विशेष म्हणजे राऊत यांनी गेल्या दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला नव्हता. रविवारी तर त्यांनी थेट सरकारमधल्या सर्व घटक पक्षांना आत्मचिंतनाचा सल्ला दिला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

संजय राऊतांमुळे शिवसेना फुटली', भाजप नेत्याचा मोठा दावा

LIVE: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार नाही

संचार साथी अ‍ॅप म्हणजे काय, ते कसे काम करेल आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत

गोलगप्पा तोंडात घालताच जबडा लॉक झाला, महिलेचे तोंड उघडेच राहिले

बंगालच्या उपसागरात भूकंपाचे धक्के जाणवले

पुढील लेख
Show comments