rashifal-2026

'हा' निर्णय सरकारचे "खुजेपण" ठळकपणे दाखविणारा आहे : बाळा नांदगावकर

Webdunia
सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:11 IST)
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षाव्यवस्थेत घट करण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंच्या जीवाला देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून ते पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका आहे. त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे "खुजेपण" ठळकपणे दाखविणारा आहे, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
 
सदरच्या निर्णयावर बाळा नांदगावकर यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते लिहितात की, राज्य सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यात राज ठाकरेंचेही नाव आले. सरकार कोणाचेही असो वास्तवाचे भान ठेवून असे निर्णय घ्यायला हवेत. राज ठाकरेंच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु साहेबांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही. साहेबांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत.
 
बाळा नांदगावकर पुढे म्हणतात की, सरकार दरबारी जी कामे होत नाहीत किंवा ज्या विषयांना मतपेटी साठी टाळले जाते असे अनेक विषय राज ठाकरेंच्या हस्तक्षेपाने निकालात निघतात. राज ठाकरेंच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तसेच पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे "खुजेपण" ठळकपणे दाखविणारा आहे. चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या यादीतील काही नावे बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील 10 बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती, असा टोलाही बाळा नांदगावकर यांनी लगावला.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments