Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुत्रप्राप्तीसाठी ५० हजार रुपये मागणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड

पुत्रप्राप्तीसाठी ५० हजार रुपये मागणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
, बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (15:13 IST)
अशी कोणतीही समस्या नाही ज्याला उपाय नाही’ अशी जाहिरात करत शहरात भोंदूगिरी करणाऱ्या एका भोंदूबाबाचा अंनिसने भांडाफोड केला. दैवी शक्ती तसेच पूजाविधी करत संतानप्राप्ती होईल असे सांगत ५० हजार रुपयांची मागणी करणारा भोंदूबाबा गणेश महाराजाचा कारभार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बनावट ग्राहक पाठवत उजेडात आणला.
 
याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी या बाबाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, भोंदूबाबाने अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या महिलेने केला असून याबाबत चौकशी करून संशयित भोंदूबाबावर यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
गंगापूररोड येथील सुमंगल प्राइड या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. ६ मध्ये भविष्य कथन करणाऱ्या गणेश महाराज या भोंदूने काही दिवसांपासून आपले बस्तान मांडले होते.भोंदूबाबाकडून जाहिरात केली जात होती. या प्रकाराची दखल घेत अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक म्हणून त्या भोंदूबाबाकडे एका महिलेला पाठवले होते. या महिलेने मूलबाळ होत नसल्याची समस्या डे मांडली. मूलबाळ होण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल. यासाठी उद्या सकाळी लाल साडी घालून या,असे सांगत भोंदूबाबाने या महिलेकडे ५० हजार रुपयांची मागणी केली.
 
हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत त्या महिलेने अंनिसच्या पदाधिकाऱ्यांसह थेट गंगापूर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात गेत गंगापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने धाव घेत भोंदूगिरी करणाऱ्या या भोंदूबाबला ताब्यात घेतले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात या भोंदूबाबावर जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अंनिसचे राज्य सचिव डॉ..ठकसेन मोराणे यांनी दिली.यावेळी अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, जिल्हा प्रधान सचिव अॅड. समीर शिंदे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
भोंदूबाबाने वाटले जाहिरात करणारे पत्रक:
उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूररोड परिसरात या महाराजाने आपले बस्तान मांडले होते. सर्वप्रकारच्या समस्यांवर उपाय मिळतील असे सांगत महाराजाने परिसरात मोठ्या प्रमाणात पत्रक वाटप करत आपली जाहिरात केली होती.
 
फसवणूक झालेल्यांनी समोर यावे:
नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराज, बाबा यांच्याविरोधात नागरिकांची पुढे येऊन तक्रारी कराव्या.अंनिसच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल. – कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास 5 वर्षे सक्तमजुरी