Festival Posters

भुशी धरण काठोकाठ भरले

Webdunia
सोमवार, 1 जुलै 2019 (16:20 IST)
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याचा भुशी धरण काठोकाठ भरुन वाहण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील पर्यटकांना इथे येण्याचे वेध लागतात. पावसासोबतच या ठिकाणी धुक्याचे प्रमाण देखील बरेच असल्याने मुंबईकर आणि पुणेकरांची या ठिकाणी दरवर्षी गर्दी पहायला मिळते.
 
पुणे आणि मुंबईचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी धरण काठोकाठ भरण्याची वाट पाहत असतात. शुक्रवारपासून मुंबई आणि पुणे परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भुशी धरण परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरण ओसंडून वाहू लागले आहे. जोरदार पावसाचा फटका मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूकीला बसला असून वाहतूक संथगतीने सुरू आहे. मात्र त्याचवेळी भुशी धरण भरल्याने पर्यटक पावसाचा आनंद लुटण्याबरोबर धरणाच्या सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने धरणाच्या पाणासाठ्यात वाढ झाली. सोमवारी सकाळपासून धरण काठोकाठ भरुन वाहू लागले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात गदारोळ

मुंबईत सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा कट उधळला; आरपीएफने महिला टोळीच्या ९ सदस्यांना अटक केली

संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये गदारोळ, आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष

CSKvsMI : मुंबईने नाणेफेक जिंकून चेन्नईविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

ठाण्यात शिवशाही बस जळून खाक; प्रवासी सुरक्षित

पुढील लेख
Show comments