Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दूध उत्पादकांचे १ ऑगस्टपासून राज्यभर आंदोलन

Webdunia
शनिवार, 18 जुलै 2020 (09:32 IST)
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी मागणीसाठी १ ऑगस्टपासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी केली.
 
‘मुख्यमंत्री दूध प्या, दुधाला भाव द्या’ असे हे अभिनव आंदोलन राहणार असून आंदोलनात रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम हे मित्र पक्षही सहभागी होणार असल्याचे डॉ.बोंडे यांनी सांगितले.
 
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे दूध व्यवसाय डबघाईला आला आहे. दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटली असून दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. राज्यात दररोज १ कोटी ४० लाख लिटरच्या आसपास दुधाचे उत्पादन होते. लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व हॉटेल्स आणि अन्य व्यवसाय जिथे दुग्धजन्य पदार्थांची गरज असते ते बंद आहेत परिणामी २०मार्चपासून पिशवी बंद दुधाचा खप ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थांची विक्री १०% ते १५% पर्यंत घटली आहे. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments