Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मायलेकींचा मृतदेहच गोदापात्रात आढळून आला

Webdunia
मंगळवार, 19 जानेवारी 2021 (07:30 IST)
नांदूरशिंगोटे बसस्थानकावरून बेपत्ता झालेल्या मायलेकींचा मृतदेहच गोदापात्रात आढळून आला आहे. 4 जानेवारी रोजी ह्या माय लेकी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर ‘नाशिक कॉलिंग’ कडून सर्वप्रथम माहिती प्रसारित करण्यात आली होती. तसेच मायलेकींसंदर्भात कुठलीही माहिती मिळाल्यास संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देखील समाज माध्यमे यावर देण्यात आला होता.
 
मात्र, आता याच मायलेकींचा मृतदेह गोदापात्रात आढळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ४ जानेवारी रोजी ज्योती राठी (वय २५) व त्यांची मुलगी जिया राठी (वय ३) या मायलेकी नांदूरशिंगोटे बसस्थानकावरून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या परिवाराने वावी पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, ७ जानेवारी रोजी ज्योती यांचा मृतदेह रामवाडी पुलाजवळ गोदापात्रात पाण्यावर तरंगताना दिसून आला. हा मृतदेह फुगून वर आला होता. परंतु, त्यावेळी महिलेची ओळख पटली नव्हती. त्यानंतर, काही दिवसांनी म्हणजेच १४ जानेवारी रोजी जिया राठी हिचा मृतदेह गांधी तलावात आढळून आला. गोदापात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे हा मृतदेह गांधी तलावात वाहत गेला असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या दोघींची ओळख पटली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

मेक्सिकोमध्ये भीषण बस अपघातात 41 जणांचा होरपळून मृत्यू

केमन बेटांच्या नैऋत्येला 7.6 तीव्रतेचा भूकंप,त्सुनामीचा इशारा

समाजसेवक बाबा आमटे पुण्यतिथि विशेष

IND vs ENG:घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असणार

LIVE: सुप्रिया सुळे यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदे यांनी दिले प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments