Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा त्याच ठिकाणी एसटी बसचे ब्रेक फेल, तत्पर चालकामुळे वाचले प्रवासी

Webdunia
गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (21:14 IST)
नाशिक : लासलगाव आगारातून सुटलेली लासलगाव- नाशिक सकाळी आठची बस औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिर्चीजवळून जात असताना, अचानक बसचे ब्रेक फेल झाले. मात्र, बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगाधानाने जवळपास ७५ ते ८० प्रवासी सुरक्षित बचावले. याच ब्लॅक स्पॉटवर मागील आठवड्यात झालेल्या अपघातात ११ प्रवाशांचा बळी गेला होता. ही घटना ताजी असताना, लासलगाव आगराच्या चालकाने दाखविलेल्या समयसूचकतेने दुर्घटना टळली.
 
लासलगाव आगाराची नियमित धावणारी लासलगाव- नाशिक बस साडेनऊच्या सुमारास जात असताना, अचानक हॉटेल मिर्चीजवळ बसचे ब्रेक फेल झाले. चालक पी. व्ही. भाबड यांनी प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित करून बसमधील जवळपास ७५ प्रवाशांना सुरक्षितपणे आडगाव नक्यापर्यंत पोहोचविले. वाहक डी. यु. राठोड यांनी सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून रवाना केले. चालक आणि वाहक या दोघांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी त्या दोघांचे आभार व्यक्त केले.
 
लासलगाव आगारातील बसेसचा दर्जा अत्यंत खालावला असून, अनेक नादुरुस्त बस रस्त्यावर धावत आहे. कोरोनापूर्वी लासलगाव आगारात ५६ बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी होत्या. मात्र, आता फक्त ३४ बसेस आहेत. आगारकडून मागणी करूनही नवीन बस येत नसल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments