Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केंद्राकडून 2160 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Center sanctioned Rs 2160 crore
, बुधवार, 8 मे 2019 (10:01 IST)
केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला आणखी 2160 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्राकडून एकूण 4248.59 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला मिळाला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. 
 
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन केंद्राने महाराष्ट्र सरकारला आणखी 2160 कोटी रुपयांचा मतदनिधी दिला आहे. यापूर्वीही जवळपास 2100 कोटी रुपयांचा निधी केंद्राने राज्याला दिला होता.  दरम्यान, मराठवाड्यात सुरू केलेल्या 694 चारा छावण्यांसाठी सुरू असलेली अनुदानाची मागणी पूर्ण झाली आहे. विभागातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत सुरू असलेल्या चारा छावण्यांसाठी 111 कोटी 87 लाख रुपये प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिओच्या प्रत्येक प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा