Marathi Biodata Maker

चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (08:30 IST)
राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण  यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय. दरम्यान, फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत आता प्रवीण चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया आलीय. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल, असं सांगत चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावलेत.
 
फडणवीसांच्या आरोपांबाबत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना माध्यमांनी विचारलं असता माझा कोणत्याही सरकारशी संबंध नाही. मी कोणतीही निवडणूक लढवली नाही. माझ्याकडून असं कुठलंही काम झालं नाही. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल. मी अजून व्हिडीओ पाहिला नाही, आवाज ऐकला नाही. हे पोलीस नाही तर फॉरेन्सिक विभागत तपासतो. याचा तपास बाहेरील राज्यातही करता येईल. कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही तर सरकार ठरवतं, अशी प्रतिक्रिया प्रवीण चव्हाण यांनी दिलीय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, बीएमसीने एक मोठे पाऊल उचलले; अनेक बांधकाम स्थळांवरील काम थांबवले

LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ५३ आणि पंचायत समितीसाठी ९२ अर्ज अपात्र ठरले

India vs New Zealand 2nd T20 : टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर स्टेडियमवर खेळला जात आहे

वैष्णो देवी यात्रा स्थगित

पैसे काढून घ्या, 4 दिवस बँक बंद राहणार

पुढील लेख
Show comments