rashifal-2026

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवना’साठी पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

विशेष पुढाकार घेऊन महाराष्ट्र भवनाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल लंडन मधील मराठीजनांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार

Webdunia
बुधवार, 3 सप्टेंबर 2025 (17:26 IST)
लंडनमधील मराठीजनांना स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाले आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र मंडळ लंडनचे ट्रस्टी वैभव खांडगे यांच्याकडे सह्याद्री अतिथिगृह येथे सुपूर्द करण्यात आला.
 
ALSO READ: ओबीसी मुद्द्यावर फडणवीस सरकारची सहा सदस्यांची कॅबिनेट उपसमिती स्थापन
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, वनमंत्री गणेश नाईक, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.
ALSO READ: एसटी महामंडळाला मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने रिकामी जमिनींचा वापर करण्यास मान्यता दिली
महाराष्ट्र मंडळ, लंडनच्यावतीने ट्रस्टी वैभव खांडगे यांनी महाराष्ट्र शासनाचे तसेच विशेष प्रयत्न करून हा निधी मंजूर करून देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. लंडनमधील मराठी बांधवांसाठी स्वतःचे सांस्कृतिक भवन असावे, ही आमची दीर्घकाळची मागणी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा निधी मंजूर करून दिला. त्यामुळे आज हा ऐतिहासिक क्षण साकारला आहे असे वैभव खांडगे म्हणाले. 
ALSO READ: सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी उपाय शोधला, जरांगे यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र मंडळ, लंडन ही भारताबाहेरील सर्वात जुनी मराठी संस्था असून तिची स्थापना 1932 मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी केली होती. स्थापनेपासून भाडेतत्त्वावर कार्यरत असलेल्या या संस्थेला अखेर स्वतःचे भवन मिळणार आहे. ‘महाराष्ट्र भवन’ हे लंडनमधील मराठी बांधवांसाठी केवळ सांस्कृतिक केंद्रच ठरणार नसून महाराष्ट्र शासन व युनायटेड किंगडम यांच्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ करणारे व्यासपीठ ठरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

मलकापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडाराच्या देवरी उड्डाणपुलावरील खड्ड्यांने घेतला आणखी एका तरुणाचा जीव

जशपूरमध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारची ट्रेलरशी धडक, पाच जणांचा मृत्यू

स्फोट झाला तेव्हा डान्स फ्लोअरवर 100लोक नाचत होते; गोवा नाईटक्लबचा व्हिडिओ समोर आला

दौंडमध्ये 430 कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी

पुढील लेख
Show comments