rashifal-2026

चितळे मिठाई : कर्मचारी पगार वाढीसाठी संपावर

Webdunia
सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (17:35 IST)

पुण्यातील  चितळे मिठाईच्या दुकानातल्या कर्मचाऱ्यांनी वाढीव पगाराची मागणी करत संप पुकारला आहे. या संपामुळे ऐन सणासुदीच्या काळात पुणेकरांना अनेक मिठाईचे पदार्थ मिळणार नाहीत. शहरातल्या काही दुकानांच्या बाहेर तर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढील काही दिवस पदार्थ उपलब्ध नसणाऱ्या पदार्थांची यादीही लावण्यात आली आहे. कोकोनट बर्फीसह डिंक लाडू, रवा लाडू, मोतीचूर लाडू, आंबा बर्फी, चिवडा असे अनेक पदार्थ सणासुदीच्या काळात चितळेंच्या दुकानातून गायब झाले आहेत. 

चितळे बंधूमध्ये बऱ्याच वर्षापासून अनेक कामगार काम करत आहेत. मात्र, पगारात म्हणावी तशी वाढ होत नसल्याचं येथील काही कामगारांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी हा संप पुकारला आहे. सध्या पुण्यात चितळेंची एकूण 20 दुकानं असून 1000 पेक्षा अधिक कामगार इथं आहेत. त्यापैकी 120 कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध, मुंबईकरांना दिलेली ही आश्वासने

घराबाहेर खेळणाऱ्या एका 6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिसऱ्या मजल्यावरून फेकले

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या

ओडिशातील ढेंकनाल येथे दगड खाणीत स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचाव कार्य सुरू

पुढील लेख
Show comments