Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आठवड्यातून एकदा ऑफिसला या, अन्यथा पगार कपात : राज्य सरकारचे कर्मचार्यांनना आदेश

आठवड्यातून एकदा ऑफिसला या  अन्यथा पगार कपात : राज्य सरकारचे कर्मचार्यांनना आदेश
Webdunia
शनिवार, 6 जून 2020 (11:08 IST)
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउननंतर आता थोडी शिथिलता मिळाली आहे. राज्यात 8 जूनपासून खासगी कार्यालये सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तर, राज्य सरकारनेही सरकारी कर्मचार्यांसाठी 5 टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे.

मात्र, असे असतानाही अनेक कर्मचारी गैरहजर आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर अनेक कर्मचारी गावी गेले आहेत तर काहीजण कोणतीही परवानगी न देता गैरहजर राहत आहेत.
 
त्यामुळे उपस्थित कर्मचार्यांतचा ताण वाढत आहे. यासाठीच सरकारने कार्यालयीन कामाचे समान वाटप होण्यासाठी परिपत्रक काढले आहे यामध्ये कर्मचार्यांचे रोस्टर तयार करून प्रत्येक कर्मचार्यायला आठवड्यातून किमान एक दिवस तरी हजर राहणे सक्तीचे केले जाणार आहे. तसेच, कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहिलेल्या कर्मचार्यांवर कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत.
 
वैद्यकीय कारणास्तव रजेवर असणार्या  कर्मचार्यांना वगळता सर्व कर्मचार्यांयना कार्यालयात हजर राहणे बंधनकारक राहणार आहे. आठवड्यातून एकापेक्षा जास्त दिवस कर्मचारी गैरहजर राहिला तर पूर्ण आठवड्याचा पगार कापण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
 
हे नवे आदेश 8 जूनपासून अमलात येणार आहेत. तसेच राज्य सरकारने कार्यालयांसाठी गाइडलाइनही जारी केली आहे. सरकारी कर्मचार्यांसाठी ऑफिसमध्ये येताना र्थमल स्क्रीनिंग, सॅनिटायझर व मास्क वापरणे बंधनकारक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

पालघरमधील नालासोपारा येथे 25 वर्षीय महिलेची आत्महत्या

महाराष्ट्र सरकार मुलींना मोफत कर्करोगाची लस देणार

LIVE: महाराष्ट्र सरकार मुलींना मोफत कर्करोगाची लस देणार

माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर सस्पेन्स कायम, आता 5 मार्च रोजी सुनावणी

डोक्यावर हेल्मेटऐवजी खांद्यावर पोपट ठेवून महिलेचा स्कूटी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments