Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाची तीव्रता कमी, महापालिका अधिकारी, कर्मचा-यांना उद्यापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

Webdunia
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (23:25 IST)
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची तीव्रता कमी झाली असून पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आस्थपनेवरील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना उद्या (बुधवार) पासून थम्ब इम्प्रेशन, फेस रिडिंग मशिनद्वारे बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक, सक्तीची करण्यात आली. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना थम्ब इम्प्रेशनमधून सवलत देण्यात आली होती. तथापि, आता कोरोनाची तीव्रता कमी झाली असून पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण देखील कमी झाली आहे. याशिवाय सर्व शासकीय कार्यालये 100 टक्के उपस्थितीमध्ये सुरु करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे महापालिकेची सर्व कार्यालये, विभाग हे 100 टक्के उपस्थितीमध्ये सुरु झाले आहेत.
 
महापालिकेच्या अस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना 1 सप्टेंबर 2021 पासून थम्ब इम्प्रेशन, फेस रिडिंग मशिनद्वारे बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक, सक्तीची करण्यात आली. ज्या ठिकाणी कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. या ठिकाणी बायोमेट्रीक उपस्थिती नोंदविणे बंधनकारक राहील. थम्ब इम्प्रेशन करताना सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments