Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पळून गेलेल्या कोरोना बाधित कैद्यावर गुन्हा

Webdunia
मंगळवार, 6 एप्रिल 2021 (10:36 IST)
उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी अटक केलेला व न्यायालयाने दि. 4 मार्चपासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याचा अहवाल बाधित आल्याने कोरोनाचे उपचार घेण्यासाठी त्याला सातारा जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डात दाखल केले होते. दि. 4 रोजी पहाटेच्या सुमारास त्याने हातातील बेडी काढून पलायन केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. मुबारक बंडीलाल आदिवासी (वय 25) रा. मध्यप्रदेश असे पळून गेलेल्या न्यायालयीन बंदी असलेल्या कैद्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या न्यायालयीन कस्टडीत असलेला मुबारक आदिवासी याच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दि. 31 मार्च रोजी त्याचा अहवाल बाधित आल्याने त्याला व किशोर हणमंत जाधव, रा. फलटण या दोघांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डात उपचारासाठी दाखल केले होते.
 
दि. 4 रोजी पहाटेच्या सुमारास पहार्याणवरील पोलीस कर्मचार्यां ना तो दिसून आला नाही. मग त्याची शोधाशोध सुरू झाली. रुग्णालय परिसरासह इतरत्र त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. ही बाब वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्याचा शोध करण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी, 100 हून अधिक जणांचा मृत्यू

इदलिबवर सीरिया-रशियाचा हल्ला, 15 ठार

लक्ष्य सेन कडून सिंगापूरच्या शटलरचा पराभव

पुढील लेख
Show comments